संत जनाबाई अभंग – भाग ५ (अभंग २२६–२७८)

कवी
संत जनाबाई
संकलक
सकल संत गाथा आणि नामदेव गाथा या संग्रहांतून
अभंग संख्या
३५०
॥ श्री गणेशाय नमः ॥

संत जनाबाईंच्या अभंगांचा हा पाचवा भाग आहे. यात अभंग क्रमांक २२६ ते २७८ आहेत. पहिल्या चार भागांत भक्तीची आस, संतांची थोरवी आणि अंतरंगाचे अनुभव दिसले; इथे जनीचा स्वर अधिक रोजच्या जगण्याकडे वळतो. जात्यावर बसलेली दासी, दळण दळता दळता ओव्या गाते, आणि त्याच दळणातून भक्तीचे पीठ भरते.

पुढच्या अभंगांत उपदेशाचा मोठा गट येतो. इंद्रियांच्या ओढीने नाश पावणारे हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि भुंगा, क्षमा आणि मृदुतेची शिकवण, देव आणि संत यांतील अभेद, तसेच कीर्तनाची गोडी असे विषय क्रमाने भेटतात. हे अभंग लहान असले तरी त्यांतील उपमा रोजच्या घरगुती अनुभवातून आलेल्या आहेत, म्हणून मनाला लगेच भिडतात. मग कृष्णजन्माचा आनंद, ज्ञानेश्वर आणि सोपानदेवांचे गुणगान आणि शेवटी संत सेना न्हावी यांच्या कथेचा अभंग येतो.

स्रोतावर काही क्रमांक चुकीचे छापलेले आहेत. २४१, २५१ आणि २५२ हे क्रमांक तिथे वेगळे दिसतात, पण जागेनुसार योग्य क्रमांक दिला आहे. काही अभंगांत छापील खुणा किंवा विरामचिन्हे अपुरी आहेत; पाठ जसा आहे तसा ठेवला आहे. अर्थ अडला तर आधी खालचे सार वाचा आणि मग पाठाकडे परत या.

226.
जात्यावरील गीतासी दळणमि गोविंदासी।।१।।
देह बुद्धीचे वैरण बरवा दाणा हो निसून||२|
नामाचा हो कोळी । गुरुआज्ञेतें मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा गजर दासी जनीचा ||४|

227.
सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेक ओव्या गाऊं कौतुके तूं मेरे बा विठ्ठला ।।१।।
जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे। लावुनी पांचीं बोटें गे तूं येरे बा विठ्ठला ।। २ ।।
सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा, तू येरे बा विठ्ठला ||३||
बारा सोळा गडणी, अवघ्या कामिनी ओव्या गाऊं बसूनि तूं येरे बा विठ्ठला ।।४।।
प्रपंचदळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढे ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥
सत्त्वाचें आधण ठेविलें पुण्य वैरिलें पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठला ॥ ६ ॥
जनी जातें गाइल कीर्त राहिल। थोडासा लाभ होईल तूं पर बाबा ||७||

228.
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें म्हणवोनि यातें भाव खुंटा ।।१।।
संचित मातृका वैरण घातली। अव्यक्ति दळिलीं व्यक्ताव्यक्त॥२॥
नामरूपा आदि दळियेलें सर्व पीठ भरी देव पंढरीचा ||३||
नवल हा देव चैसला दळणीं नाहीं केली जनी नामयाची ॥४॥

229.
भक्तिभावें बळे गा देव महाराज पंढरिराव ॥१॥
पंढरीसी जावें। संतजनीं भेटावें ॥२॥
भक्ति आहे ज्याचे चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥
भाव धरा मनीं । म्हणे नामयाची जनी ||४||

230.
बांधोनियां हात गयावळ मारिती। दंड ते करिती मोक्षासाठीं ।।१।।
गेले ते पितर मोक्षालागीं तुझे। आतां देई माझे दक्षिणेसी ॥२॥
बापुडें कॅश बोडिती मिशी दाढी मग दक्षणा हिरडी खातसे हे ।।३।।
फार काय सांगू मेल्याविण मुक्ती नाहीं ते वांछित स्वप्नख ॥४॥
अनंत जन्म मृत्यु होता जैसे दुःख त्याहून अशेष आहे तेथें ॥५॥
भांबावले जन धांवे आटाआटी सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥
नलगे गाळावें नलगे तळावें । नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥
मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे जीव जातां देह जनी नाहीं ||८||

231.
धनियाचें पड़पें गेला । जीव जिवें जीव झाला ||१||
देहीं देह हारपले। गेह गेहातीत झालें ॥२॥
झाला आश्रम आश्रमा जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥

232.
झाली जगाचिये सीमा वस्तुभाव येर व्योमा।।१।।
पहा हो अधिकारी नको असोनी भिकारी॥२॥
पट तंतूंचा घडला घट मृत्तिकेचा झाला ॥३॥
पहा श्वानसमची पंडित। जनी म्हणे एकचि मात ||४॥

233.
नाद पडे कानीं। मृग पैज घाली प्राणी ।।१।।
आवडी अंतरीं। गज मेला पडे गारी ॥२॥
चोख पाहे अंग दिये नाडला पतंग ॥३॥
गोडी रसगळा मच्छ अडकला गळा ||४||
गंधे अलि नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥

234.
श्रृंगीचिया अंगी कोणते हो वह शरिर अनादळ केली आळी ॥१॥
काय तिने तपमुद्रा परिवेली म्हणोनियां झाली भृंगी अंगे॥२॥
अरे वा शहाणिया तैसा करी जय संतयोगे पाप नाही होय ॥३॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा संदेह न धरा करा पूजा ॥४॥

235.
जहाज तारिलें तारिलें शेवटीं उगमासी आलें ॥१॥
भाव शिडासी लाविला नाम फरारा सोडिला ॥२॥
कथा भरियेलें केणें । घ्या रे नका दैन्यवाणें ॥३॥
एका मनाचा विसार आधी देउनी निर्धार ||४|
कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ||५||
आर्तभूत व्हा रे जनी म्हणे केर्णे घ्यारे ।।६।।

236.
हेंचि देवांचें भजन सदा राहे समाधान ।।१।।
येर अवधे संसारिक। इंद्र देव ब्रह्मादिक ||२||
वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती।।३।।

237.
चोरा संगतीनें गेला। वाटें जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसर्वे खेळे । न जळे तो परी पोळे।।३।।
विश्वासला चोरा जनी म्हणे घाला बरा ||४||

238.
जग विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानीं ॥१॥
मग तुज काय उणें झाले सोयरे त्रिभुवनें ।।२।।
साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ||३||
मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ||४||

239.
सुर्खे संसार करावा माजी विठ्ठल आठवावा ।। १॥
असोनियां देहीं छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥
जैसा सूर्य घटकाशी तैसी देहीं जनी दासी||३||

240.
अंगीं हो मैं शांती दया क्षमा सर्वांभूतीं ।। १ ।।
जेथें जाऊन पाहे देवा ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥
आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥
जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ||४||
बहु अपराध केला म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥

241.
मृदु वाहे पाणी ब्रज मानी ऐसे लोगी।॥१॥
क्षमा ऐसी जिवीं क्रोधभूत हे पृथ्वी ॥२॥
गंधमाती सरी करुनी आपुली कस्तुरीं ॥३॥
गुणदोष मना नाणीं म्हणे बहिरी होय जनी ||४||

242.
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां । ।१॥
पटाकारणें हे जनी पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
भावेंवीण भजलें मिऊनियां झांकी डोळे ॥३॥
म्हणे काय पाहूं येतें भिन्न नव्हे वस्तु जेथें ||४||
भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

243.
आक्रोशें ध्यानासी आणी पुरुषोत्तमा। पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ।।१।।
अखंडित शुद्ध असावें अंतर। लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥
बोलें तें वचन बहु हळुवट। सुमना अंगीं दाट जडभार||३||
नाम तें स्मरण अमृत संजिवनी म्हणे दासी जनी हेंचि करा ||४||

244.
आम्ही आणि संत संत आणि आम्ही सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥
दीप आणि सारंग सारंग आणि दीप ध्यान आणि जप काय दोन || २ ||
शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांति। समाधान काय तृप्ति दोन ||३||
रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग। देह आणि अंग काय दोन ||४||
कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान यश आणि मान काय दोन ॥५॥
देव आणि संत संत आणि देव म्हणे जनी भाव एक ऐसा ||६||

245.
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ।।१।।
माता ते वेगळी कुच ते उरींचे। म्हणोनियां त्याचें मर्दन करी ॥२॥
पाप तें वेगळें पुण्य तें आगळें म्हणोनी गरळें पितो मद ।। ३ ।।
दिवस उगवतां पाहों नये त्यातें। जेणें हो संतांतें द्वेषियेलें ||४||
तयाचा विटाळ वाहे रजस्वला म्हणे जनी चांडाळा बोलावू नका ॥५॥

246.
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी काय या दोन्हीपणी वेगळीक।।१।।
माती तेचि धूळ धूळ तेचि माती। भेंडा आणि भिंती काय दोन॥२॥
साखरी गोडी गोडी साखरेसी थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥
डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा। शांति ज्ञानकळा काय मिन्न ||४||
वदन ते ओठ ओठ ते वदन। क्षेम आलिंगन काय दोन ॥ ५॥
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ आशा आणि लोभ काय दोन ॥६॥
संत तेचि देव देव तोचि संत म्हणे जनी मात गोष्टी भिन्न ।।७।।

247.
प्रपंचीं जो रडे । ब्रह्मवन त्यातें जहे ।। १ ।।
ऐसा अखंडित ब्रह्मीं विठ्ठला जो कर्माकर्मी ॥ २॥
पुत्रदेह ध्याया ध्यानी कांता धन वो कामिनी ॥३॥
सिंधूसी सांडावा जनी म्हणे गा सदेवा ||४||

248.
काम लागे कृष्णापाठी केली स्मशानाची गांठी ।।१।।
परम कामें भुलविला कृष्ण स्मशानासी नेला ||२||
भुलविला मनीं रुद्र पाहोनी मोहनी ॥३॥
कन्वेचिये पाठीं ब्रह्म लागे हतवटी ॥४॥
काम पराशरालागी ज्ञानासी लाविली आगी ।।५।।
काम गेला शुकापाठीं म्हणे जनी मारी काठी।।६।।

249.
भजन करी महादेव राम पूजी सदाशिव ।।१।।
दोघे देव एक पाही । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद। ऐसे देव तेही सिद्ध ।।३।।
जनी म्हणे आत्मा एक। सर्व घटीं तो व्यापक ||४|

250.
पतंग सुखावला भारी उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांती मुकला। दोहीं पदार्थी नाडिला॥२॥
विषयांचे संगतीं बहू गेले अधोगती ।।३।।
ऐसे विषयानें मुलविले जनी म्हणे वांयां गेले ॥४॥

251.
येऊनियां जन्मा एक करा देहाचें सार्थक।।१।।
वाचें नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ||२||
ऐसा नामाचा महिमा शेष वर्णितां झाली सीमा ||३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं म्हणे नामयाची जनी ।।४

252.
विवेकाची पेठ । उघडी पंढरीची वाट ।।१।।
तेथें नाहीं कांहीं धोका उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें। शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी देव करा ऐसा ऋणी ॥४॥

253.
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें। म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥
आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला पुढे तेणें उमविला दुजा एकू ।।२।।
समूळ साल माया सांडूनियां दिजे। परि अहं बीज जतन करा ।।३।।
तें बीज भाजोनि करा ओवाळणी संतांचे चरणीं समूळ देह ||४||
पुढे त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलांची ||५||
आहे नाहीं देह घरी ऐसा भाव म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥

254.
नाना व्रत तप दान । मुखीं हरीस्मरण ।।१।।
येथें असो द्यावा भाव। पुरवी अंतरींचें देव ॥२॥
हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ।।३।।
भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यांसी धांवतो सामोरा ||४||
लक्ष लावा पायांपाशीं म्हणे नामयाची दासी ॥५॥

255.
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन विध्वंसिला प्राण हातां नये ।।१।।
गजमाथां मोतीं सपांचा तो मान। गेलीयाही प्राण हातां नये ।।२।।
सिंहान पतिव्रतेचे स्तन गेलियाही प्राण हातां नये ।।३।।
विरायांवाचुन देह अहंभाव जनी म्हणे देव हातां नये ॥४॥

256.
संसारी निधान लाधले जनां सद्गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥
कायावाचामनें तयास देवावीं । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥ २॥
तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण एन्हवीं तें आपणामाजीं आहे॥३॥
असतां सम्यक परि जना चुकामुक । भुलली निष्टंक मंत्रतंत्रें ॥ ४॥
माळं वेष्टण करी टापोर घेत शिरीं नेम अष्टोत्तरीं करिताती ॥५॥
जो माळ करविता वाचेसि वदविता । तथा हृदयस्था नेणे कोणी ।।६।।
सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट! सद्गुरु वरिष्ठ तोचि जाणा ||७||
तया उत्तीर्णता व्हावया पदार्था न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥

257.
कीर्तनासी जातां मागी टाकी पाय अमर देह होय कळे त्यासी ॥१॥
ओखद तरी तेथे घड़े हिंसा जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥ २॥
गंगा वाराणसी धरोनि पदरी चाललीसे नारी दोहींकडे ||३||
आमच्या बापाची ऐकावया कीर्ति जाऊं म्हणोन घेतीं ऐक्य कथीं ||४||
कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी असूं द्या अंतरी गोष्ट हित ॥५॥
बन्हाडी धांवे जैसा प्रयोजनीं तान्हेलें तें पाणी पुसावया। ॥६॥
व्याकुळ तें एक चुकलें बाळक । त्या धांवे शोक हांका मारी ||७||
अशी कथे जातां गंगा त्या चरणीं । म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥

258.
कीर्तनाचा रस आवडे नरासी लागती पायांसी मुक्ति चान्ही ।।१।।
वारी पंढरीची निश्चय म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ।। २।।
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ति । जनी म्हणे किती सांगूं फार॥३॥

259.
गौळण म्हणे गौळणीला पुत्र जाहला यशोदेला ।।१।।
एक धांवे एकीपुढें । तार्टी वा सुंठवडे ।।२।।
सुइणीची गलबल झाली दासी जनी हेल घाली ॥३॥

260.
मग म्हणे नंदाजीला पुत्रमुख पाहूं चला।।१।।
स्नान घालून त्यासी वस्त्रे दिली ब्राह्मणांसीं ॥२॥
परब्रह्म तें पाहुनी । ब्रह्मीं मिळे दासी जनी ।।३।।

261.
आलिया ब्राह्मणासी दान द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥
गाईम्हसीची खिल्लारें । ब्राह्मणा दिली अपारें ।।२।।
कामधेनूची उभनी कल्पवृक्षाची दाटणी।।३।।
ऐसा आनंदसोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

262.
वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
संगतसे हा अंगणी माथा जावळाची वेणी॥२॥
पाय पैंजण आणि वाळे हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा ते माय दासी जनी बंदी पाय ॥४॥

263.
ब्रह्मा वंदी ज्याचे पाय त्याची यशोदा ते माय ।।१।।
सामराज्याचा जो दानी मागे यशोदेसी लोणी ॥२॥
क्षीरसागर ज्याचे चरणीं । त्याला पायावरतें न्हाणी ||३||
देव ब्रह्मांड पालकीं त्याची टाळू हातें मारी ||४||
शुक सनकादिक योगी जनी म्हणे लागी ||५||

264.
अहो गोकुळींच्या देवा आदि अंत तुम्हां ठावा ।।१।।
न लगे पुसावें हो कोणां आदि अंत हो सुजाणा ।।२।।
जनी म्हणे वो गोकुळ किती खासी उहावळी ॥३॥

265.
असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत ।।१।।
त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी ग्रासोग्रास उच्छिष्ट खासी ॥ २॥
न म्हणे सोंवळें आंवळें। प्रत्यक्षचि तें आंवळें ||३||
स्वानंदाचे डोहीं हात धुतले सर्वांही निश्चित ||४||
हातीं काठ्या पायीं जोडे। दासी जनी वाट झाडे ||५||

266.
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाहा वाटी ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचूं लागला ||३||
नाचतां नाचतां देवाला गळला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ||४||
साधु या संतांनी देवाला धरिला मनगटीं काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वामाजीं वरिष्ठ जड मूढ भाविका सोपी केली पायवाट ||६||
नामयाची जनी लोळे संतांच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देई गे बिठाई ||७||

267.
भाव अक्षराची गांठी । ब्रह्मज्ञानानें गोमटी।। १।।
ते हे माया ज्ञानेश्वरी संतजनां माहेश्वरी ||२||
ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दासी जनी ||३|

268.
गीतेवरी आन टीका त्यांनी वाढियेली लोकां।।१।।
रानताटामाजी त्यानं योगरिले कांजी ॥२॥
या ज्ञानेशावांचोनी म्हणे नामयाची जनी ॥३॥

269.
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ।।१।।
मरोनियां जायें। वा माझ्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ||३||
जावे वोवाळुनी जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥

270.
मायेहूनि माय मानी। करी जिवाची ओवाळणी ।।१।।
परलोकींचें तारूं । म्हणे माझा ज्ञानेश्वरू||२||
वित्त गोत चित्त पाहे । सत्य वंदी गुरुचे पाय ||३||
पतिव्रते जैसा पती जनी म्हणे सांगों किती ॥४॥

271.
संत राउळा चालिले ज्ञानेश्वर तंव बोले।। १॥
केवढे नवल सांगावें। दासी जनीचें पद ल्याहावें ||२||
पाय जोडुनी विटेवरी कटी हात उभा हरी ॥३॥
रूप सांवळें सुंदर कानी कुंडल मनोहर ||४||
सोनसळा वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥५॥
गरुडपारी सन्मुख उभा जनी म्हणे धन्य शोभा ॥ ६ ॥

272.
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें। मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ||२॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार परमानंद खेचर लिहिता होता।।३।।
सांगे पूर्णानंद लिही परमानंद भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव कार्याचा वसुदेव का होता।।५॥
चोखामेळ्याचा अनंतभट्ट अभ्यंग म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ।।६।।

273.
सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ति दातार ।।१।।
महाविष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥ २ ॥
ब्रह्मा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ||३||
आदि शक्ति मुक्ताबाई। दासी जनी लागे पायीं ॥ ४ ॥

274.
सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रह्म म्हणती ॥१॥
ऐसे बोले पुराणांत । सृष्टिकर्ता जो भगवंत ॥२॥
जनी म्हणे हा सोपान ब्रह्मा अवतरला पूर्ण ॥३॥

275.
नामयाचा गुरु। तो हा सोपान सद्गुरु ॥१॥
कन्हेवरी करुनी वस्ती ब्रह्मपुरी तिशीं म्हणती ||२||
माझ्या जिवींच्या जीवना हृदयीं राहें तूं सोपाना||३||
चित्त उद्धव ज्याची सत्ता जनी म्हणे माझ्या ताता ॥४॥

276.
वाचें म्हणतां सोपान प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥
सोपानदेव करितां जप समूळ नासे त्रिविधताप ॥२॥
सोपानदेव धरितां ध्यानें पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥
दासी जनी तल्लिन झाली सोपानचरणीं विनटली ॥४॥

277.
शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥
त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत || २ ||
नव्याण्णवाच्या सालीं मुक्ताई देखिली। जनी म्हणे केली मात त्यांनीं ||३||

278.
सेना न्हावी भक्त मला तेणें देव भुलविला ॥ १ ॥
नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी।।२।।
रूप पालटोनि गेला। सेना न्हावी विठ्ठल झाला ॥३॥
काखें घेउनी धोकटी गेला राजियाचे भेटी ।।४।।
आपुलेहातेंभारघालीराजियाचीसेवाकेली||५||
विसरतोपडलारामा। कायकरूंमेघश्यामा||६||
राजा अयनियांत पाहे । चतुर्भुज उभा राहे ।।७।।
दूत धाडूनियां नेला। राजियानें बोलाविला ॥८॥
राजाबोलेप्रीतिकर। रात्रीसेवाकेलीफार||९||
राजसदनाप्रती न्यावें । भीतरींच घेउनी जावें।।१०।।
आतां बरा विचार नाहीं। सेना म्हणे करूं काई ।।११।।
सेना न्हावी गौरविला राजियानें मान दिला।।१२।।
कितीकांचा शीण गेला । जनी म्हणे न्हावी झाला ।।१३।।

सार

दळणाची गाणी (अभंग २२६ ते २२८). जातं फिरतं आणि जनीची ओवी त्याच्या तालावर चालते. अभंग २२७ मध्ये प्रत्येक चरणाच्या शेवटी विठ्ठलाला हाक आहे, तू ये रे बा विठ्ठला. जीव आणि शिव हे दोन खुंटे, पाच बोटे आणि प्रपंचाचे दळण असे रूपक रचत ती दळणातून भक्ती उभी करते. २२८ मध्ये वैराग्याने जातं फिरवलं, आणि पीठ भरणारा देव पंढरीचा आहे, असा शेवट आहे.

उपदेशाचे अभंग (२२९ ते २५८). सुरुवातीला भक्तिभावाने पंढरीला जाण्याचा आणि संतांना भेटण्याचा सल्ला आहे. २३० मध्ये पितरांसाठीच्या विधींचा आणि मोक्षासाठी होणाऱ्या दंडांचा उल्लेख करून जनी सांगते की नामाशिवाय मुक्तीसाठी धावपळ करण्याची गरज नाही. २३३ मध्ये नाद, रूप, रस आणि गंध यांच्या ओढीने अडकणारे प्राणी दिसतात, तर २३७ आणि २५० मध्ये वाईट संगत आणि विषयांची ओढ किती घातक ठरते ते उदाहरणांतून येते. २४० ते २४३ मध्ये शांती, दया, क्षमा आणि मृदु बोलणे यांचे महत्त्व सांगितले आहे. २४४ ते २४६ मध्ये देव आणि संत, पाणी आणि मेघ, सूर्य आणि किरण यांच्यात फरक नाही असे सांगत जनी भेदाची कल्पना सोडायला सांगते, आणि २४९ मध्ये शिव आणि राम यांच्यात भेद नसल्याचे सांगते. २५३ मध्ये आंब्याचा रस चोखून साल आणि बीज टाकण्याच्या दृष्टान्तातून अहंकाराचे बीज संतांच्या चरणी वाहण्याचा विचार आहे. २५४ ते २५८ मध्ये व्रत, तप, दान यांपेक्षा हरिस्मरणाची गोडी, सद्गुरूची सेवा आणि कीर्तनाचा रस यांवर भर आहे.

कृष्णजन्म आणि बालक्रीडा (२५९ ते २६६). यशोदेला पुत्र झाल्याचा आनंद, नंदाचा उत्सव आणि ब्राह्मणांना दिलेली दाने या अभंगांत दिसतात. बाळकृष्ण अंगणात खेळतो, लोणी मागतो आणि गोपाळांच्या शिदोऱ्यांतून घास घेतो. २६६ मध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात एकच टाळी वाजते आणि कीर्तनात नामदेव, ज्ञानदेव आणि इतर संत एकत्र रंगतात.

ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि सेना न्हावी (२६७ ते २७८). ज्ञानेश्वरीबद्दलचा आदर, ज्ञानेश्वरांना सखा आणि भाऊ मानण्याचा भाव, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई यांच्या स्तुतीचे अभंग येथे आहेत. सोपानदेवांचे नाव घेण्याने मिळणाऱ्या शांतीचे वर्णन २७६ मध्ये आहे. शेवटच्या अभंगात सेना न्हावी राजाची सेवा करायला जातो आणि देव त्याचे रूप घेऊन ती सेवा पार पाडतो; म्हणून जनी म्हणते, न्हावी झाला तो विठ्ठल.

संसाधने (Resources)
संग्रहाची वैशिष्ट्ये

रोजच्या घरकामातून उमललेली विठ्ठलभक्ती
साधी, घरगुती आणि थेट मराठी भाषा
अभंग, ओव्या आणि आख्यानपर रचना
स्त्रीच्या मनाचे प्रामाणिक चित्रण
नामयाची दासी असा अभिमानाचा आत्मपरिचय

संबंधित संत
Scroll to Top