स्रोत आणि नियम
आम्ही लेख कसे लिहितो
प्रत्येक लेख स्वतःच्या शब्दांत लिहिला जातो. दुसऱ्या संकेतस्थळावरचा किंवा पुस्तकातला मजकूर आम्ही जसाच्या तसा घेत नाही. लेखाच्या शेवटी “संसाधने” या पेटीत त्या लेखासाठी प्रत्यक्ष वाचलेल्या स्रोतांचे दुवे दिलेले असतात.
किती स्रोत तपासतो
- संतांचे चरित्र: किमान पाच मान्य स्रोत
- ग्रंथ, अभंग-संग्रह, तीर्थक्षेत्र आणि स्तोत्र/आरतीचा परिचय: किमान तीन स्रोत
- सण आणि इतर माहिती-लेख: किमान दोन स्रोत
- तीर्थक्षेत्राच्या वेळा आणि नियमांसाठी मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ
सणांच्या तारखा
सणाची तारीख आम्ही दोन स्वतंत्र पंचांग-स्रोतांतून तपासतो. दोन्हींत फरक असेल तर तिसरा स्रोत पाहतो. स्मार्त आणि वैष्णव पद्धतीनुसार तारीख वेगळी असेल तर दोन्ही तारखा लेखात देतो. तारीख अंदाजाने लिहीत नाही. सगळ्या तारखा दिनदर्शिका पानावर एकत्र दिसतात आणि दरवर्षी अद्ययावत केल्या जातात.
जुन्या ग्रंथांचा आणि रचनांचा पूर्ण पाठ
जुने ग्रंथ, अभंग, आरत्या आणि स्तोत्रे यांचा पूर्ण पाठ आम्ही फक्त तिथेच देतो जिथे त्या रचनेच्या हक्काचा कालावधी संपलेला आहे. असा पाठ दोन स्रोतांशी जुळवून घेतलेला असतो. आधुनिक संपादकांच्या टीपा, भाषांतर किंवा अर्थ आम्ही कॉपी करत नाही. जिथे हक्काची खात्री नसेल तिथे फक्त परिचय आणि स्वतःच्या शब्दांतला अर्थ देतो. मोठे ग्रंथ (उदा. ज्ञानेश्वरी) भागांत, क्रमाने दिले जातात.
सुविचार
संतवचन फक्त जुन्या ग्रंथातून, संदर्भासह दिले जाते. abhang.in चा स्वतःचा विचार वेगळा ओळखू येईल असा दाखवला जातो.
चूक आढळली तर
कृपया contact@abhang.in वर कळवा, सोबत त्या लेखाचा दुवा द्या. आम्ही स्रोत पुन्हा तपासून लेख सुधारतो. अस्वीकरण पानही पाहा.