संत जनाबाई अभंग – भाग ४ (अभंग १६४–२२५)

कवी
संत जनाबाई
संकलक
सकल संत गाथा आणि नामदेव गाथा या संग्रहांतून
अभंग संख्या
३५०
॥ श्री गणेशाय नमः ॥

संत जनाबाईंच्या अभंगांचा हा चौथा भाग आहे. यात अभंग क्रमांक १६४ ते २२५ आहेत. आधीच्या भागांत घरकामातला विठ्ठल, भेटीची आस आणि गुरूकडून शिकलेले ज्ञान दिसले; इथे संत आणि वैष्णवांची थोरवी, पंढरीच्या वारीचा आनंद आणि अनुभवाच्या खुणा एकत्र येतात. अभंग लहान आहेत, पण प्रत्येकात जनीचा स्वतःचा, थेट आवाज जाणवतो.

या भागात वाचकाला एक गोष्ट लगेच दिसेल. अभंग १८८ पासून पुढे काही रचना आधीच्या भागांतील अभंगांशी आशयाने जुळतात, फक्त शब्दरूपे थोडी वेगळी आहेत. स्रोतावर ते तसेच मांडलेले आहेत आणि पाठ त्यानुसारच घेतला आहे; कोणतीही जोडणी किंवा सुधारणा केलेली नाही.

अभंग २१० आणि २१८ चे क्रमांक स्रोतावर चुकीचे छापलेले आहेत, पण जागेनुसार योग्य क्रमांक दिला आहे. अर्थ अडला तर आधी खालचे सार वाचा आणि मग पाठाकडे परत या. हे अभंग मोठ्याने म्हणून पाहा; लहान ओळींमुळे ते लवकर तोंडी बसतात.

164.
संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक ॥१॥
चंदनाचे संगें पालटती झाडें। दुर्बलांकडे देवमाथां ||२॥
हैं कां ऐसे व्हावे संगती स्वभावें आणिके न पालटायें देहालागीं ||३||
तैसा निःसंगाचा संग अग्रगणी जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ||४||

165.
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये ।।१।।
कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे। यासाठी आवडे संत करी ॥२॥
संत ऐसे करी देवाचे कान सांडियेल्या ध्यान कोण ऐके।।३।।
संत घुसती तरी देवाचे ते पाय आगमा न गमे सोय मागाडीये ||४||
संत पुससी तरी देवाचें तें पोट धरूनियां बोट दाविती हरी।।५।।
संत म्हणसी तरी देवाचा हा गळा । जेणें रस आगळा वेदादिकां ।।६।।
संत जरी पुससी तरी देवाचें वदन । माझें तें वचन संत झाले ||७||
पराविया चारी सांडूनि मीपणीं संता बोले वाणी विठोबाची ||८||
परेचिया चारी आनंदामाझारी संत झाले अंतरी पडजीभ देवा ||१||
क्षस्ते नासिलें अक्षर तें काढिलें । निःशब्दाचें झालें बोले संत।। १०॥
शब्द तो उडाला नाद तो बुडाला भेद तो आटला माया भावीं ।।११।।
विठो बटावरी पारविया झाले केश ते वाढले माय संत ।।१२।।
कुरळ होऊनियां देती ते सुदा म्हणे जनी वोवाळ जीवैभावें॥१३॥

166.
या वैष्णवाच्या माता तो नेणवें देवां देतां ||१||
तिहीं कर्म हैं पुसिलें अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥
कानाचे हे कान झालें धरूनियां ध्यान ॥ ३॥
डोळियाचा डोळा करुनी धाले प्रेम सोहळा ||४||
तोही वश्य नरदेहीं जनी दासी बंदी पायीं ॥५॥

167.
भक्तांमाजीं अग्रगणी पुंडलिक महामुनी ।।१।।
त्याचे प्रसादें तरलें। साधुसंत उद्धरिले ॥२॥
तोचि प्रसाद आम्हांसी । विटेवरी हृषीकेशी ।। ३ ।।
पुंडलिक बापमाय दासी जनी बंदी पाय ||४||

168.
अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें || १ |
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं। धांवोनियां देई दुडदुडां ।। २।।
बहु कासाविस होतो माझा जीव कनवाळ्याची कींव येऊं द्यावी।।३।।
नामयाची जनी म्हणावी आपली पायी सांभाळावायें।४॥

169.
आंधळ्याची काठी अडकली कवणें बेटीं ।।१।।
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
मुर्के मी पाडस चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजवीण काय करूं प्राण किती कंठीं धरूं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे धांव घालीं माझें आये ॥५॥
माझी भेटवा जननी संतां विनवी दासी जनी ॥६॥

170.
पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥
पुरुषार्थे चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ||२||
धन संपत्तीचा दाता होय पाहतां पंढरिनाथा ||३||
संताचे चरणीं लोळे नाचे दासी जनी ॥४॥

171.
विष्णुमुद्रेचा अंकिला। तोचि वैष्णव एक भला || १॥
अहं जालोनी अंगारा सोहं भस्मी तीर्थ सारा ||२||
विष्णु माया द्वारावती भक्तिमुद्रा त्या मिरवती ||३||
पंचायतन पूजी भावें अहं सोहं भस्मी नांवें ||४||
प्रेमतुळसी कानीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

172.
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार। तिजा तो चांभार रोहिदास ||१||
सजण कसाई बाया तो कसाब। वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ||२||
कमाल फुलार मुकुंद जोहरी। जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥
वैष्णवांचरणीं करी ओवाळणी तेथें दासी जनी शरीराची ॥५॥

173.
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें। उसे देउनी अंगें चितारिती ॥१॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी अखंड द्वेष करी सज्जनांचा॥३॥
विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन। पाखांडी हे म्हणे करिती काई ||४||
पंचरस पात्रा कांता है बुडविती । उद्धरलों म्हणती आम्ही संत ॥५॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥

174.
पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरीं ।।१।।
हो कां उत्तम चांडाळ पायीं ठेवीन कपाळ ॥२॥
वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषीश्वरा ||३||
मुखीं नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

175.
आले वैष्णवांचे भार दिले हरिनाम नगार।।१।।
अवघी दुमदुमली पंढरी। कडकडाट गरुडपारीं ॥२॥
टाळ मृदंग धुमाळी रंगणी नाचे वनमाळी ||३||
ऐसा आनंद सोहळा दासी जनीं चाहे डोळां ॥४

176.
श्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदार साधुसंतां ऐसे केलें जनीं ॥१॥
संतांचे परसी दासी मी अंकिली। विठोबानें दिली प्रेमकळा ||२||
बिदुर सात्विक माझिये कुळीचा अंगिकार त्याचा केला देवें ।।३॥
न विचारितां कुळ गणिका उद्धरिली नामें सरती केली तिहीं लोकीं ||४||
ऋषींची कुठे उच्चारिली जेणें स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥
नामयाची जनी भक्तीतें सादर। माझें तें साचार विटेवरी ॥६॥

177.
संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत॥१॥
तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत प्रेमें हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाचें जो जिव्हार ||४||
ऐशा संतांशरण जावें। जनी म्हणे त्याला घ्यावें ॥५॥
संत जनाबाई अभंग – आत्मस्वरूपस्थितिपर

178.
सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव। हृदयीं पंढरिराव राहतसे ।। २।।
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठलचरणीं जोनी टेली।।३।।
नामयाचे जनरी विश्रांति झाली हृदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥२४॥

179.
वामसव्य दोहींकडे देखूं कृष्णायें रूपदें।।१।।
आतां खाले पाहूं जरी चहुंकडे दिसे हरी ।।२।
चराचरी जे जे दिसे में से अविद्याची नासे।।३।।
माझे नाठवें मीपण तेथें कैंचें दुजेपण ।।4।
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥ ५ ॥

180.
धरिला पंढरीचा चोर गळां बांधोनियां दोर ॥१॥
हृदय बंदिखाना केला आंत विठ्ठल कोंडिला ||२॥
शब्द केली जवाजुडी विठ्ठल पायीं घातली बेडी ||३||
सोहं शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला ||४||
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥

181.
दळू कांडूं खें। सर्व पाप ताप जाळूं।।१।
सर्व जिवामध्यें पाहूं एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रह्म होऊं। ऐसें सर्वाघ पाहूं ॥३॥

182.
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले।।१।।
नाहीं नाहीं म्हणती आम्ही सांगसी त्या लागूं काम ||२||
नाहीं तरी जाऊं देशीं जनी नामयाची दासी ॥३॥

183.
भ्रांति माझें मन प्रपंची गुंतलें श्रवण मनन होऊनी ठेलें ।।१।।
बायें बोधिलें बायें बोधिली। बोधुनी कैसी तद्रूप झाली ||२||
निजध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरूपीं देखिला बाईयांनो ।।३।।
नामयाची जनी स्वयंबोध झाली अवघाचि पुसिला ठाव देखा ॥ ४॥

184.
संतमहानुभाव येती दिगंबर नम्रतेचे घर विरळा जायें ||१||
निवाले मीपण ते जे ठायीं नाहीं सोहं शब्द सोई तेथें कैंची ||२||
पाहतां हा कोण दावितां हा कोण पाहातां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥
नामयाची जनी निज वस्तु झाली। अवध्यासी बुडाली परब्रह्मीं ॥४॥

185.
त्या वैष्णवांच्या माता तो नेणें देव ताता ||१||
तिहीं कर्मे हैं पुसिलें अकर्म समूळ नाहींसें केलें ॥ २॥
कानाचा हो कान झालें धरूनियां ध्यान ।।३।।
डोळियाचा हो डोळा। करुनि झालें प्रेमसोहळा ||४||
सोहि बसे नरदेहीं जनी दासी बंदी पायीं ॥५॥

186.
देहभाव प्राण जाय। तेव्हां हें धैर्य सुख होय ||१||
तया निद्रे जे निजले गाव जागृती नाहीं आले || २ ||
ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ||३||
तेथें सर्वांग सुखीं झालें लिंग देह विसरलें ||४||
त्या एकी एक होता दासी जनी नाहीं आतां ॥५॥

187.
जोड झाली रे शिवासी प्रांत फिटली जिवाची ।।१।।
आनंदची आनंदला आनंद बोधसि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी। ब्रह्मानंदे गिळिला पोटीं ||३||
एकपण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ||४||
ऐसी सद्गुरूची करणी दासी जनी विठ्ठल चरणीं ।।५।।

188.
बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरुरायाचाही।। ब्रह्म झाला जो चिनाकार देख पुढे ओंकाराची रेख। तूर्या म्हणावें तिसी ।। १ ।।
माया महत्तत्त्वाचें सुभर तीन पांचाचा प्रकार। पुढें पंचविसांचा भार। गणति केली छत्तीसी ।।२।।
बारा सोळा एकविस हजार आणिक सहाशांचा उबार माप चाले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं चौथे पुरुष चार नारी ओळखुनी सर्वाशी अंतरी राहिले पांचव्यापासीं ॥४॥
पांच शहाणे पांच मूर्ख पांच चालक असती देख पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ।।५।।
एक बीजाचा अंकुर होय वृक्षासी विस्तार शाखा – पत्रें फळ फुलभार। बीजापोटीं सामावें ।।६।।
कांतीण तंतूशी काढून वरी क्रीडा करिती जाण शेवटीं तंतूशी गिळून एकटी राहे आपसी ।।७।।
वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आणितां मना । कनकीं नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवासी ||८||
नामदेवाच्या प्रतापांत शिरी विठोबाचा हात जनी म्हणे केली मात पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥

189.
नम्रतेविण योग्यता मिरविती ते केवीं पावती ब्रह्मसुख ।। १ ।।
लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवी पावती केशवातें ||२||
एक संत म्हणविती न हिंडती। अंतरीची स्थिति खबर।।३॥
झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ।।४।।
सागरी गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनियां तियेसी नाम नाहीं ॥५॥
नामयाची जनी निर्गुणी बोधिली ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥

190.
शब्दार्थे ब्रह्म लौकिकीं हो दिये। जैसे ते फांसे मर्यादांचें।।१।।
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण दोहींचा आपण साक्षभूत ||२||
स्वयें सुखें धाला आपणातें विसरला तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥
नामयाची जनी सागरीं मिळाली परतोनि मुळीं केवीं जाय ||४||

191.
अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी ।।१।।
पांडुरंग नाम जप हेंचि माझें महा तप ||२||
ऐसें आलें प्रत्ययासी सहज तेणें तत्त्वमसी।।३।।
पावलिया हो स्वपद। सहज बिराला तो शब्द ||४||
संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥

192.
देव खातें देव पितें । देवावरी मी निजतें ।।१।।
देव देतें देव घेतें । देवासर्वे व्यवहारितें ||२||
देव येथें देव तेथें। देवाविणें नाहीं रितें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई भरूनि उरलें अंतरबाहीं ॥४॥

193.
श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देहस्थिती पालटली ॥१॥
धन्य माझा इह जन्म हृदयीं विठोबाचें नाम ||२॥
तृष्णा आणि आशा पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं विठ्ठल उभा आहे ।।४।।

194.
जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे।।१।।
मग म्हणे वो देवासी दासी || २ ||
नामयाचा प्रसाद झाला जनीला आनंद ॥३॥
संत जनाबाई अभंग – तुमच्या नामयाची

195.
झाली पूर्ण कृपा आहे ऐसा पूर जो कां पाहे ।।१।।
ऐसा पर जोकां पाहे स्थापिला तोचि होय ॥ २॥
पूर्णपद जो गुरुपुत्र जनी म्हणे धन्य झाला ॥३॥

196.
नित्य हातानें वारावें। हृदय अंतरीं प्रेरित जावें।।१।।
ऐसा स्वरूपाचा पूर आला असे नेत्रावर ||२||
स्वरूपाचा पूर आला । पाहतां डोळा झाकुळला ॥ ३॥
जनी म्हणे ऐसा पूर। पाहे तोचि रघुवीर ||४||
संत जनाबाई अभंग – योगपर

197.
गगन सर्वत्र तत्त्वतां । त्यासी चिखल लावू जातां ।।१।।
तैसा जाण पांडुरंग भोग भोगुनी निःसंग ॥२॥
सिद्ध सनकादिक। गणगंधर्व अनेक।।३॥
जैसी वांझेची संतती। तैसी संसार उत्पत्ती ॥४॥
तेथे कैचें धरिसी ध्यान दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥ ५ ॥

198.
काळाचिये लेख नाहीं ब्रह्मा विष्णु मुख्य ॥१॥
युगा एक लव झडे। तोही न सरे काळापुढें ॥२॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ||३॥
महीपाल स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥
वर्म चुकली बापुडीं । दासी जनी विठ्ठल जोडी ||५|

199.
रक्तवर्ण त्रिकुट स्नान श्रीहाट पाहे श्वेतवर्ण।।१।।
श्यामवर्ण तें गोलाट निळबिंदु औट पीट॥२॥
वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारीं गुरु आहे ।। ३।।
नवद्वारातें भेदुनी दशमद्वारी गेली जनी ॥४॥

200.
शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे ।। १ ।।
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधः शून्य ॥ २॥
ऊर्ध्वशून्य श्वेतवर्ण मध्यमशून्य श्यामवर्ण ॥ ३॥
महाशून्य वर्ण नीळ त्यांत स्वरूप केवळ ॥४॥
अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥

201.
ज्योत पहा चमकली काय सांगूं त्याची बोली ।। १ ।।
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
परापश्यंती मध्यमा। वैखरेची झाली सीमा ।। ३॥
चारी वाचा कुंठित जाहाली सोहं ज्योत प्रकाशली ।।४।।
ज्योत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥ ५॥

202.
ज्योत परब्रह्म होय खेचरी दर्पणीनें पाहे ।।१।।
इडा पिंगळा तिन्ही पाहे हृदयभुवना शा ।।२।।
हळू हळू रीघ करी सूक्ष्म हृदय अंतरीं ||३||
हृदय कमळावरी जासी जनी म्हणे मुक्त होसी ॥४॥

203.
नाहीं आकाश घडणी। पाहा स्वरूपाची खाणी ||१||
स्वरूप हैं अगोचर। गुरु करिती गोचर ||२||
गोचर करिताती जाणा । दृष्टि दिसे निरंजना ||३||
नाहीं हात पाय त्यासी जनी म्हणे स्वरूपासी ॥४॥

204.
माझे मनीं जें जें होतें तें तें दिधलें अनंतें ।।१।।
देह नेउनी विदेही केलें शांति देउनी मीपण नेलें ॥२॥
मूळ नेलें हें क्रोधाचें। ठाणें केलें विवेकाचें ||३||
निज पदीं दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ||४||
संत जनाबाई अभंग – निश्चयपर

205.
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ||२||
नित्य हाचि कारभार। मुखीं हरि निरंतर ||३||
मायबाप बंधुबहिणी । तूं वा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

206.
चला पंढरीसी जाऊं। रखुमादेवीवर पाहूं ।। १॥
स्नान करूं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥
डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा॥3॥
ऐसा निश्चय करुनी म्हणे नामयाची जनी ॥४॥

207.
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ||१||
आला विषयाचा कंटाळा जाऊं भेटू त्या गोपाळा ||२||
आवडीनें जगजेठी गळां घालुनियां मिठी॥३॥
आवडीनें गुज कानीं म्हणे नामयाची जनी |४||

208.
तुझा लोभ नाहीं देवा तुझी करिना मी सेवा ||१||
नाहीं अंग थोरपण । मिथ्या नरिसी गुमान ॥२॥ ॥
राया येउनी काय करिशी तुझे बळ आम्हांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥

209.
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं ।।१।।
सर्वभावें गाईन नाम। सखा तूंचि आत्माराम ||२|
नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रूप न्याहाळीन दृष्टी सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥ ४ ॥
दीनानाथा चक्रपाणी दासी जनी लावी ध्यानीं॥५॥

210.
आतां भीत नाहीं देवा आदि अंत तुझा ढाया ॥१॥
झाले नामाचेनि बळकट तेथे कुपवाट |२॥
ज्ञान वैराग्य विवेक बळें तें तंब आम्हांसवें खेळे ॥३॥
दयां क्षमा आम्हांपुढे जनी म्हणे झाले येडे ||४||

211.
माझें चित्त तुझे पायीं ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा काया मनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरूं जनी म्हणे विठ्ठल स्मरूं ॥३॥

212.
आम्ही पातकांच्या राशी आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं आतां तारी अथवा मारीं।।२।।
जनी म्हणे सृष्टीवरी एक अससी तूं वा हरी ॥३॥

213.
मना लागो हाचि धंदा रामकृष्ण हरि गोविंदा ।। १ ।।
जिव्हे करूं नित्य नेम सदा विठोबाचें नाम ||२॥
नामामध्यें नामसार। जप करी निरंतर ||३||
म्हणे जनी नाम घेणें नाममंत्र शंकर होणें ||४||

214.
स्मरण तें हेंचि करूं। वाचें रामराम स्मरूं ॥१॥
आणिक न करूं तें काम वाचें धरूं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ||३||

215.
मनामार्गे मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥
मग आम्हां काय उणे दया करी नारायण ॥२॥
जनी म्हणे ऐसें मन करूं देवा हो आधिन ।।३।।

216.
सत्त्वरजतमें असे हैं बांधिलें। शरीर दृढ झाले अहंकारें ।।१।।
सांडीं अहंकार धरीं दृढभाव हृदयीं पंढरिराय धरोनियां ।।२।।
नामयाची जनी भक्तीसी मुलली ते चरणी राहिली विठोबाचे।।३।।

217.
नित्या सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां ।। १ ।।
वनवासी कां धाडिलें । कृपाळे वा हो विठ्ठलें || २ ||
आशा मनशा तृषा तिन्ही ह्या तो ठेविल्या बांधोनि ।।३।।
काम क्रोध विषय झाले। हें ताँ मोहोनि राहिलें ।।४।।
अवलोकृति कृपा दृष्टि। जनी म्हणे देई भेटी ॥५॥

218.
करूं हरीचें कीर्तन गाऊं निर्मळ ते गुण ।।१।।
सदा धरू संतसंग मुखी म्हणूं पांडुरंग ॥२॥
करूं जनावरी कृपा रामराम म्हणवू लोकां ॥ ३॥
जनी म्हणे कीर्ति करूं नाम बळकट धरूं ॥४॥

219.
आनंदाचे डोहीं। जो कां समुळ झाला नाहीं।।१।।
कीर्तनें जन्मला हरीभक्तीनें शिंपिला॥२॥
आळवितसे अंतवरी वाचा नाम लाहो करीं ||३||
समूळ झाला नाहीं। देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥

220.
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥
नलगे बैकुंठ न वांछू कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥
नलगे संतति धन आणि मान। एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥
सत्य कीं मायीक आमुचे बोलणें तुमची तुम्हां आण सांगा ही ||४||
जीवभाव आम्ही सांई वाळूनि म्हणे दासी जनी नामयाची ॥५॥

221.
आतां येतों स्वामी कृपा असो द्यावी तुम्ही ॥१॥
बहु दिवस सांभाळ केला पुन्हां जन्म नाहीं दिला ॥२॥
थोर सुकृताच्या राशी तुमचे पाय मजपाशीं ॥३॥
ऐसा नामदेव बोले। ऐकोनी दासी जनी डोले ||४||

222.
मी तो समर्थांची दासी मिठी घालीन पायापासीं ।।१।।
हाचि माझा दृढभाव करीन नामाचा उत्सव ॥२॥
आम्हां दासीस हैं काम मुखीं विठ्ठल हरिनाम ॥ ३॥
सर्व सुख पायीं लोळे जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥

223.
नामयाचे ठेवणें जनीस लाधलें। धन सांपडलें विटेवरी ।।१।।
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश | धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें दैवत तो हा पंढरिनाथ । तेणें माझा अर्थ पुरविला ॥४॥
संसारीचे सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ||५||
नामयाचे जनी आनंद झाला हृदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥

224.
धन्य ज्याचे चरणीं गंगाओध झाला मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥
धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा। बोल ठेवीं कर्मा आपुलीया ॥ २॥
शुक सनकादिक फिरती हरिजन नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥
ते चरण आम्हांसी गवसले अनावासी धन्य झाली दासी जनी म्हणे ||४||

225.
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी ॥ १॥
हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ।।२।।
पंढरिच्या पेठें मांडियेलें पाल। मनगटावर तेल घाला तुम्ही ||३||
जनी म्हणे देवा, मी झालें वेसवा रिघालें केशवा घर तुझें ॥४॥

सार

संत आणि वैष्णवांची थोरवी (अभंग १६४ ते १७७). संतांचा संग चंदनासारखा आहे, जवळच्या झाडांनाही आपला सुगंध देतो, असे १६४ मध्ये जनी सांगतात. अभंग १६५ मध्ये संत म्हणजे देवाचे डोळे, कान, पाय, पोट, गळा आणि वदन, असे एकेका अवयवाचे रूपक आहे. खरा वैष्णव कोण, याचे उत्तर १७१ ते १७३ मध्ये मिळते: विष्णुमुद्रा मिरवणारा तोच नाही, तर कबीर, चोखामेळा, रोहिदास, सजन कसाई असे एकनिष्ठ भक्त जनीला वैष्णव वाटतात. सोंग घेणाऱ्यांना आणि कीर्तनाचा द्वेष करणाऱ्यांना त्या सरळ शब्दांत बाजूला ठेवतात. १६७ मध्ये पुंडलिकाचे स्मरण आहे, १६८ मध्ये आळंदीत इंद्रायणीकाठी ज्ञानाबाईला घातलेली हाक आहे, आणि १६९ मध्ये पाडस चुकलेल्या हरणीसारखी आर्त आळवणी. १७४ ते १७७ मध्ये पंढरीचे वारकरी, टाळ-मृदंगाचा गजर आणि संतांना शरण जाण्याचा आनंद दिसतो.

अंतरंगाची अनुभूती (अभंग १७८ ते २०४). मूर्ती हृदयात ठसल्यावर आशा-तृष्णा मावळतात आणि चहूकडे हरी दिसतो, असे १७८ आणि १७९ मध्ये आहे. १८० मध्ये जनी हट्टाने पंढरीच्या चोराला दोराने बांधून हृदयाच्या बंदिखान्यात कोंडते आणि म्हणते, जीव गेला तरी तुला सोडणार नाही. १८१ मध्ये दळता-कांडता सर्व पाप-ताप जाळून सगळीकडे एकच ब्रह्म पाहण्याचा विचार येतो. १८८ ते १९४ मध्ये गुरूकडून शिकलेल्या ज्ञानाचे रूपक, नम्रतेचे महत्त्व, ‘देव खातें देव पितें’ ही रोजच्या व्यवहारातील देवाची जाणीव आणि जिकडे तिकडे हरी दिसण्याचा अनुभव येतो. १९५ ते २०३ मध्ये स्वरूपाचा पूर, शून्याचे रंग, ज्योत, चार वाणी आणि दशमद्वार अशा साधनेच्या खुणा आहेत. २०४ मध्ये पुन्हा साधी कृतज्ञता आहे: मनात होते ते देवाने दिले, मीपण नेले आणि विवेकाचे ठाणे बसवले.

नाम, पंढरी आणि समर्पण (अभंग २०५ ते २२५). दळता-कांडता अनंताला गाईन, असा निश्चय २०५ मध्ये आहे. २०६ आणि २०७ मध्ये जनी नामदेवांना ‘चला पंढरीसी जाऊं’ म्हणून हाक घालते. २०८ मध्ये लडिवाळ तक्रार आहे, तुझा लोभ नाही आणि सेवाही करत नाही, पण तुझे बळ आमच्याजवळ आहे. २१२ मध्ये पातकांच्या राशी घेऊन आलेली जनी म्हणते, तार किंवा मार. २१३ ते २१८ मध्ये नाम, स्मरण आणि कीर्तन हेच रोजचे आचरण म्हणून सांगितले आहे. २२० मध्ये स्वर्ग, वैकुंठ, कैलास, संतती, धन आणि मान सगळे नको, एक विठोबाचे ध्यान पुरे. २२१ मध्ये नामदेवांचे ‘आता येतो’ ऐकून जनी हेलावते, आणि २२३ मध्ये नामयाचे ठेवणे आपल्याला लाभले, असा कृतज्ञ भाव आहे. २२५ मध्ये डोईचा पदर खांद्यावर घेऊन, हातात टाळ आणि खांद्यावर वीणा घेऊन जनी भरल्या बाजारातून पंढरीची वाट धरते.

संसाधने (Resources)
संग्रहाची वैशिष्ट्ये

रोजच्या घरकामातून उमललेली विठ्ठलभक्ती
साधी, घरगुती आणि थेट मराठी भाषा
अभंग, ओव्या आणि आख्यानपर रचना
स्त्रीच्या मनाचे प्रामाणिक चित्रण
नामयाची दासी असा अभिमानाचा आत्मपरिचय

संबंधित संत
Scroll to Top