संत जनाबाई अभंग – भाग १ (अभंग १–६८)
संत जनाबाईंच्या अभंगांचा हा पहिला भाग आहे. यात अभंग क्रमांक १ ते ६८ आहेत, म्हणजे या संग्रहाची सुरुवात आणि त्याचे पहिले तीन विषय. पहिले पंधरा अभंग विठ्ठलनामाचा महिमा सांगतात. त्यानंतरचे अठरा अभंग विठ्ठलाचे रूप, पुंडलिकाची कथा आणि पंढरीचे माहात्म्य उलगडतात. शेवटचे पस्तीस अभंग करुणेचे आहेत; त्यात जनाबाई एखाद्या लेकरासारखी देवाला हाक मारतात, कधी गाऱ्हाणे मांडतात, कधी पाया पडतात.
जनाबाई संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहत होत्या. दळणे, कांडणे, पाणी भरणे अशा रोजच्या कामांमध्येच त्यांची भक्ती फुलली, आणि त्याचा सूर या अभंगांच्या शब्दांतून अगदी सहज ऐकू येतो. भाषा साधी, घरगुती आणि थेट आहे; म्हणूनच ती थेट मनाला भिडते.
या भागातील अभंग लहान आहेत, बहुतेक तीन ते पाच ओळींचे, आणि प्रत्येकाच्या शेवटी ‘जनी म्हणे’ अशी त्यांची नाममुद्रा येते. हे लक्षात घेऊन वाचले की शब्दांमागचा भाव लवकर कळतो. खालील पाठ जुन्या छापील संग्रहातून जसा मिळाला तसा घेतला आहे. त्यातील काही शब्दरूपे आजच्या बोलीपेक्षा वेगळी दिसतील, तीही तशीच ठेवली आहेत. काही अर्थ कळला नाही तर खालील सार आधी वाचून पुन्हा पाठाकडे वळा.
१.
गाता विठोबाची कीर्ती महापातकें जळतीं ॥ १ ॥
सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर ॥२॥
आठवितां पाय त्याचे मग तुम्हां भय कैंचें॥३॥
कायावाचामनें भाव। जनी म्हणे गावा देव ॥४॥२.
जन्मा येऊनियां देख करा देहाचें सार्थक॥१॥
वाचें नाम विठ्ठलाचें तेगें सार्थक देहाचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥ ३॥
नाम तारक त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥ ४ ॥३.
नाम फुकट चोखट नाम घेतां नये वीट ॥१॥
जड शिळा ज्या सागरीं। आत्मारामें नामें तारी ॥२॥
पुत्रभाव स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें ॥ ३॥
नाममहिमा जनी जाणे। ध्यातां विठ्ठलचि होणें ॥४॥४.
एक नाम अवघे सार वरकड अवघें तें असार ॥ १ ॥
म्हणोनियां परतें करा आर्धी विठ्ठल हैं स्मरा ॥२॥
जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥५.
काय हैं करावें। धनवंतादि अवघे ॥१॥
तुझें नाम नाहीं जेथें। नको माझी आस तेथें ॥२॥
तुजविण बोल न मानीं। करीं ऐसें म्हणे जनी ॥३॥६.
विठ्ठल नामाची नाहीं गोडी काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळां बांधोनि खांबासी विंचू लाविती जिव्हेसी ॥ २ ॥
ऐसा अभिमानी मेला। नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना। दासी जनी लागे चरणा ॥४॥७.
तो हा भक्तांचे तोडरीं । वाचें उच्चारितां हरी ॥१॥
काम होऊनि निष्काम। काम भावभक्ति प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय । ॥३॥
काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥ ४ ॥८.
नाम विठोबाचे घ्यावें। मग पाऊल टाकायें॥१॥
नाम तारक हैं थोर नामें तरिले अपार ॥२॥
आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणी म्हणे नामयाची जनी ॥४॥९.
निराकारीचे नाणें । शुद्ध ब्रह्मींचें ठेवणे ॥१॥
प्रयलें काढिलें बाहेरी। संतसाधु सवदागरीं॥२॥
व्यास वसिष्ठ नारदमुनी। टांकसाळ घातली त्यांनी॥३॥
उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनी आटविली चांदी ॥|४॥
केशव नामयाचा शिक्का। हारप चाले तिन्ही लोकां॥५॥
पारख नामयाची जनी वरती विठोबाची निशाणी ॥६॥१०.
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला॥१॥
पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं॥२॥
अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तथा विघ्न ॥३॥
जनी म्हणे हरिहर भजतां वैकुंठीं त्या घर॥४॥११.
नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥ १ ॥
ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥
नाम गाय वेळोवेळां । दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥१२.
मारूनियां त्या रावणा राज्य दिधलें विभीषणा ॥१॥
सोडवूनि सीता सती। राम अयोध्येसी येती ॥२॥
ख्याती केली रामायणीं म्हणे नामयाची जनी ॥३॥१३.
येऊं ऐसें जाऊं। जनासंगें हेंचि दाऊं॥ १॥
आपण करूं हरिकीर्तन। जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
नाम संशयछेदन। भवपाशाचे मोचन ॥३॥
जनी म्हणे हो देवासी होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥१४.
हरिहर ब्रह्मादिक। नामें तरले तिन्ही लोक ॥१॥
ऐसा कथेचा महिमा झाली बोलायाची सीमा ॥ २ ॥
जपें तर्फे लाजविलीं । तीर्थे शरणागत आलीं ॥३॥
नामदेवा कीर्तनीं । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥
देवती देती ग्वाही । जनी म्हणे सांगू कायी ॥५॥१५.
व्हायें कथेसी सादर मन करूनियां स्थीर ॥१॥
बाबा काय झोपी जाता। झाले चौन्यांशी खाता ॥२॥
नरदेह कैसा रे मागता भेटी नव्हे त्या सीताकांता॥३॥
आळस निद्रा उठावदी जा स्वरूप पाला मिठी ॥४॥
जनी म्हणे हरिचें नाम मुखीं म्हणा धरूनि प्रेम ॥५॥१६.
पुंडलिक भक्तबळी विठू आणिला भूतळीं ॥१॥
अनंत अवतार केवळ उभा विटेवरी सकळ॥२॥
वसुदेवा न कळे पार नाम्यासवें जेवी फार ॥३॥
भक्त भावार्था विकला। दासी जनीला आनंद झाला ॥४॥१७.
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
भलें घालूनियां को परब्रह्म दारापुड़े ॥२॥
घाव घातला निशाणीं ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥
जनी म्हणे पुंडलिका । धन्य तूंचि तिन्ही लोकां॥ ४ ॥१८.
पंढरीचे सुख पुंडलिकासी आलें । तेणें हैं बाढिलें भक्तालागीं ॥ १ ॥
भुक्ति मुक्ति वरदान दियलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणांलागीं ॥ २॥
उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिलें ॥३॥१९.
अरे विठ्या विट्या मूळ मायेच्या कारट्या ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली जन्मसावित्री चुडा पाली॥२॥
तुझें गेलें म तुला पाहून काळ रहे॥३॥
उभी राहूनी आंगणी शिव्या देत दासी जनी ॥४॥२०.
जन्म खातां उष्टावळी सदा राखी चंद्रावळी॥१॥
राहीरुक्मिणीचा कांत भक्तिसाठी कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी म्हणे देवराज करी भक्ताचें हो काज ॥४॥२१.
ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निःसंग ॥१॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संतति जैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथें कैंची या परिसी ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥२२.
स्मरतांचि पावली तरी भक्तांसी लासी॥१॥
ऐसें कांहीं न पडे देवा वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस मग कोण पुसे देवास ॥३॥
को चक्रपाणी तुज आधी लाही जनी ॥४॥२३.
बाप रखुमाबाई वर माझें निजाचें बाहेर ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर। जग मुक्तीचें माहेर ॥२॥
तेथें मुक्ति नाहीं म्हणे जनी न पाहे त्याची वदने ।३॥२४.
अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माळ गांठीं। भाविकांसी पाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हातें । कष्टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोले त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥२५.
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी म्हणे पूर्ण काम विठ्ठल देवाचा विश्राम॥३॥२६.
योग शीण झाला । तुजवांचुनी विठ्ठला ॥१॥
योग करितां अष्टांग । तुजविण शुका रोग॥२॥
बैसला कपार्टी। रंभा लागे त्याच्यापाठीं ॥३॥
तई त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला॥४॥
सांगोनी पुत्रार्ते। त्यांचि छळिलें कश्यपाते ॥५॥
अमराच्या राया। म्हणे जनी सुखालया ॥६॥२७.
आळवितां धांव पाली ऐसी प्रेमाची भुकेली॥१॥
ते हे बी स्वानंदाचें लेणेंल्याली पाहून दासी जनी घाली ॥२॥
विटेवरी उभा नीट केली पुंडलिकें धीट ॥३॥२८.
स्तन पाजायाशी आली होती ते माउशी ॥१॥
तिच्या उरावरी लोळे विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥
मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडीं रे अनंता ॥३॥
लिंग देह विरविरलें । जनी म्हणे या विठ्ठलें ॥४॥२९.
अहो यशोदेचा हरी गोपिकांसी कृपा करी ॥१॥
वेणु वाजवितो ही सर्व देवांचा साहाकारी||२||
धांवे धांवे गाईपाठी जनी म्हणे जगजेठी॥३॥३०.
विठो माझा लेकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥
निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी ॥२॥
पुढे चाले ज्ञानेश्वर मार्गे मुक्ताई सुंदर ॥ ३॥
गोरा कुंभार मांडिवरी चोखा जीवा बरोबरी ॥४॥
बंका कडियेवरी नामा करांगुळी धरी ॥५॥
जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा ॥६॥३१.
नोवरीया संगें वन्हाडीया सोहळा मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनि संगें लोहो होय सोनें तयाची भूषणे श्रीमंतासी ॥२॥
जनी म्हणे जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥३२.
तुझ्या निजरूपाकारणें वेडावालीं षड्दर्शनें ॥१॥
परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासी ॥२॥
चारीश्र में हो कष्टती। वेदशाखे धुंडाळिती ॥३॥
परि कवर्णे रीति तुला न जाणवे जी विठ्ठला ॥४॥
तुझी कृपा होय जरी दासी जनी ध्रुपद करी ॥५॥३३.
पंढरी सांडोनी जाती वाराणसी काय सुख त्यांसी आहे तेथें ॥ १॥
तया पंचक्रोसी म्हणती मरावें। मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥ २ ॥
नको गा विठोबा मज धाडूं काशी सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥
मरचीमात्र वेरण स्तंभीं घाली घालोनियां गाळीं पापपुण्य ॥४॥
जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥
आई आई बाबा म्हणती काय करूं। ऐसें दुःख थोरू आहे तेथें ॥६॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी। तैसा तो कवळी काळनाथ॥७॥
लिंगदेहादिक करिती कंदन तेथील यातना नको देवा ॥८॥
न जाय तो जीव एकसरी हरी रडती नानापरी नानादु:खें ॥९॥
अमरादिक थोर थोर भांबावले। भुलोनियां गेले मुक्तीसाठीं ॥१०॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरी आणि भीमातीरी मोक्ष आला॥१२॥
सख्या पुंडलिका लागतांचि पाया। मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥
पर रिपवणी मुक्ति होय दासी मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥
मोक्ष सुखासाठी मुक्ति लोळे। वीं नेपे कोणी कदा काळीं ॥१५॥
मोक्ष मुक्ति जिहीं हाणितल्या पायीं। आमुची ती काय धरिती सोयी ॥ १६ ॥
समर्थाचे घरी मिक्षा नानापरी मागल्या पदरी पालिताती ॥१७॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक। सामराज्याचें सुख तुझें ॥ १८॥
जनी म्हणे तुज रखुमाईची आण जरी मज क्षण विसंबसी ॥ १९॥३४.
पाय जोडूनि विटेवरी कर ठेउनी कटावरी ॥१॥
रूप सांवळें सुंदर कानी कुंडलें मकराकार ॥२॥
गळां माळ वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥३॥
गरुड सन्मुख उभा म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥३५.
येगे माझे विठाबाई कृपादृष्टीने तूं पाही॥१॥
तुजविण न सुचे कांहीं। आतां मी वो करूं कांहीं ॥२॥
माझा भाव तुजवरी आता रक्षी नानापरी ॥३॥
येई सखये धांडनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥३६.
हात निढळावर ठेवूनी वाट पाहे चक्रपाणी ॥१॥
धाव धाव पांडुरंगें। सखे जीव लगे अन्तरंगे ॥ २ ॥
वाट पहाते जगदीशा हांसे करू नको जनासी ॥३॥
तुजवाचुनि दाही दिशा म्हणे नामवासी दासी ॥४॥३७.
सख्या घेतलें पदरीं। आतां न टांकावें दुरी ॥ १ ॥
थोरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
ब्रह्मयाच्या ताता। सज्जना लक्षुमीच्या कांता ।।३॥
आपुली म्हणवूनि आण गावी दासी जनी ॥४॥३८.
गंगा गेली सिंधूपाशी त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी ते सांगावें कवणाला ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥
जळ कोपे जळचरा माता अव्हेरी लेकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आलें। अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥३९.
माझी आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटीं ॥१॥
आतां सांगू मी कवणासी । धांवें पावें हषीकेशी ॥२॥
तुजवांचूनी विठ्ठला । कोणी नाहीं रे मजला ॥३॥
माथा ठेवीं तुझे चरणीं म्हणे नामयाची जनी ॥४॥४०.
कां गा न येसी विठ्ठला ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी मला सांभाळी निर्वाणीं।।२।।
त्वां वा उद्धरिलें थोर । तेथे किती मी पामर ॥ ३॥
दीनानाथा दीनबंधु । जनी म्हणे कृपासिंधू ॥४॥४१.
अगा रुक्मिणीनायका सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥
ते तूं धांवें माझे आई सखे साजणी विठाबाई ॥२॥
अगा शिवाचिया जपा | मदन ताता निष्यापा ॥३॥
आपुली म्हणवुनी अपंगावी दासी जनी ॥४॥४२.
नाहीं केली तुझी सेवा दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥
नट पापीण मी हीन नाहीं केलें तुझे ध्यान ॥ २॥
जें जें दुःख झालें मला तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥ ३ ॥
रात्रंदिवस मजपाशीं दळूं कां लागलासी ।।४।।
क्षमा करावी देवराया दासी जनी लागे पार्या ॥५॥४३.
येरे येरे माझ्या रामा मनमोहन मेघश्यामा ||१||
संतमिसें भेटी । देई देई कृपा गोष्टी ।।२।।
आमची चुकवी जन्मव्याधी । आम्हां देई हो समाधी ॥३॥
जनी म्हणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४।।४४.
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना।। १॥
मी तो अज्ञानाची रासी म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥
जनी म्हणे आतां मज सोडवीं कृपावंता ॥३॥४५.
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥
तुम्हां थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें॥२॥
अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥
दयेच्या सागरा। जनी म्हणे अमरेश्वरा॥४॥४६.
आम्हीं जावें कवण्या ठाया। न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेली सिंधूपाशीं जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळ कोपलें जळचरासी माता न घे बाळकासी ॥३॥
म्हणे जनी आलें शरण जरी त्यां धरिलेंसें मौन्य ॥४॥४७.
ऐक बापा हृषीकेशी । मज ठेवीं पायांपाशीं ॥१॥
तुझें रूप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥
हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥
तुजविण देवराया | कोणी नाहीं रे सखया॥४॥
कमळापति कमळा पाणी दासी जनी लागे चरणीं ॥५॥४८.
पोट भरूनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥
धिरा घिरा पांडुरंगा । मज कां टाकिलें निःसंगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार। मजला नाहीं आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी । तुझे कृपें तरली जनी ॥४॥४९.
अविद्येच्या वो रात्रीं आडकलों अंधारी।।१॥
तेथुनी काढायें गोविंदा यशोदेच्या परमानंदा ॥२॥
तुझे सन्निधेचे पाशीं ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥
तुझे संगतीं पावन उद्धरिलें ब्रहों पूर्ण ॥४॥
अजामेळ शुद्ध केला म्हणे दासी जनी भला ॥५॥५०.
धन्य कलत्र माय। सर्व जोडी तुझे पाय ॥१॥
सखा तुजवीण पाहीं दुजा कोणी मज नाहीं ॥ २॥
माझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी ॥३॥५१.
रुक्मिणीच्या कुंका। सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥
तूं धांव माझे आई। सखे साजणी विठाबाई ॥२॥
शिवाचिया जपा | मदनताता ये निष्पापा॥|३॥
दयेच्या सागरा म्हणे जनी अमरेश्वरा ||४|५२.
मी वत्स माझी गायी। नये आतां करूं काई ॥१॥
तुम्ही तरी सांगा कांहीं शेखी विनवा विठाबाई॥२॥
येई माझिये हरणी चुकलें पास दासी जनी ॥३॥५३.
सख्या पंढरीच्या राया। घडे दंडवत पायां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
वेध माझ्या चिता हाचि लागो पंढरीनाथा ॥३॥
जायें भवानी जन्मोजन्मी म्हणे जनी ॥४॥५४.
कां गा उशीर लाविला माझा विसर पडिला ॥१॥
तुजवरी संसार बोळविले परदा॥२॥
तो तूं आपुल्या दासासी म्हणे जनी विसंबसी ॥३॥५५.
किती सांगूं तूंतें। बुद्धि शिकवणें हैं मातें ॥१ ॥
सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळी हर्षे दीनां ॥२॥
शिकवावें तूंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥
स्वामीलागीं धीट ऐसी म्हणती शिकवी जनी दासी ॥४॥५६.
शिणल्या बाह्या आतां येऊनियां लावी हाता ॥१॥
तूं माझें वो माहेर काय पहातोसी अंतर ॥२॥
वोवाळुनी पायां जीवेंभावें पंढरिराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेंकी। म्हणे जनी हैं विलोकीं ॥४॥५७.
योग न्यावा सिद्धि। सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरूपाच्या रूपा सांब राजाचिया बापा ॥२॥
ब्रह्मयाच्या ताता म्हणे जनी पंढरिनाथा ॥३॥५८.
माय मेली बाप मेला आतां सांभाळी विठ्ठला ॥ १॥
मी तुझें गा लेंकरूं नको मजशी अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा। थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकल जीवाच्या जीवना म्हणे जनी नारायणा ॥६॥५९.
अहो सखीये साजणी ज्ञानाबाई हो हरणी॥। १॥
मज पाडसाची माय भक्ति वत्साची ते गाय ॥२॥
कां गा उशीर लाविला तुजविण शिण झाला ॥३॥
अहो बेसले दळणीं धांव पाली म्हणे जनी ॥४॥६०.
काय करूं या कर्मासी धांव पाव हृषीकेशी॥१॥
नाश होतो आयुष्याचा तुझें नांव नये वाचा ॥२॥
काय जिणें या देहाचें अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥
व्यर्थ कष्टविली माता तुझे नाम नये गातां ॥४॥
जन्ममरणाचें दुःख म्हणे जनी दाखवी मुख ॥५॥६१.
अहो ब्रह्मांडपाळका ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवाघेतलेपदींतेंतूंटाकूंनकोदुरी॥ २॥
होते लोकांमध्यें निंद्य त्वां जगांत केले वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी परिसावी माझी विनवणी ॥४॥६२.
येई जीवाचिया जीवा रामा देवाचिया देवा ॥१॥
सर्व देव बंदीं पडिले रामा तुम्हीं सोडविले ॥२॥
मारूनियां लंकापती सोडविली सीता सती ॥३॥
देवा तुमची ऐसी ख्याती रुद्रादिक से वर्णिती ॥४॥६३.
अहोदेवाहरिहरउतरा आम्हांभवपार॥१॥
देवा आम्ही तुझे दास। करूं वैकुंठी वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष देवदुशासी ॥ ३॥६४.
शरण आलों नारायणा। आतां हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला। हिरण्यकश्यपू मारिला ॥ ३॥
जनी म्हणे देवा शरण व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥६५.
ऐका बापा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१ ॥
माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आसनकरींनिरासआर्तभूतां॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा अभय तो द्यावा कर तय ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा। अढळपद ध्रुवा दिधलेंसें ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारू काय वानूं॥५॥
म्हणे दासी जनी आलें या कीर्तनीं तथा कंठाळुनी पिटूं नका ॥६॥६६.
गजेंद्रासी उद्धरिलें । आम्हीं तुझें काय केलें ॥ १॥
तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिका॥ २॥
वाल्हाकोळीअजामेळ । पापीकेलापुण्यशीळ॥३॥
गुणदोष मना नाणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥६७.
राजाई गोणाई अखंडित तुझे पायीं ॥१॥
मज ठेवियलें द्वारी नीच म्हणोनि बाहेरी॥२॥
बारागाँदामहादाविठाठेवियलेंअग्रवाटा॥३॥
देवा केव्हां क्षेम देसी। आपुली म्हणोनि जनी दासी ॥४॥६८.
काय करूं पंढरीनाथा काळ साह्य नाहीं आतां ॥१॥
मज टाकिलें परदेशीं नारा विटा तुजपाशी ॥२॥
श्रमबहुझालाजीवा । आतांसांभाळीकेशवा॥३॥
कोण सखा तुजविण । माझें करी समाधान ॥४॥
हीन दीन तुझे पोटीं जनी म्हणे द्यावी भेटी ॥५॥
सार
नामसंकीर्तन माहात्म्य (अभंग १ ते १५). या अभंगांचा सूर एकच आहे: नाम सर्वात मोठे. नाम घ्यायला पैसा लागत नाही, मोठे अनुष्ठानही लागत नाही; वाचेने फक्त विठ्ठल म्हणायचे. जनाबाई सांगतात की नामाच्या बळावर जड शिळा सागरात तरली, कोळी आणि कुंभार तरले, अजामेळ तरला. जिथे नाम नाही, तिथे धनवंतांचा थाटही त्यांना नको. नवव्या अभंगात नामाला खर्या नाण्याची उपमा आहे: संतांनी टांकसाळ घातली आणि त्यावर नामदेवांचा शिक्का उमटला. शेवटी कीर्तनाला जाताना झोपेतून जागे व्हा, आळस सोडा, अशी मायेची दटावणी येते.
विठ्ठल माहात्म्य (अभंग १६ ते ३३). पुंडलिकाच्या भावामुळे विठ्ठल पंढरीत विटेवर उभा राहिला, म्हणून पुंडलिकाचे कौतुक इथे वारंवार येते. एका अभंगात जनाबाई आंगणात उभी राहून देवालाच खडसावते; भक्त आणि देव यांच्यातली जवळीक त्याहून वेगळी कशी दाखवावी? तिसाव्या अभंगात विठ्ठल लेकुरवाळा दिसतो: निवृत्ती खांद्यावर, सोपान हात धरून, ज्ञानेश्वर पुढे, मुक्ताई मागे, आणि गोरा, चोखा, बंका, नामा सोबत. शेवटचा दीर्घ अभंग काशीपेक्षा पंढरी श्रेष्ठ का, ते सांगतो: येथे मुक्ती स्वतः संतांच्या पायाशी लोळते.
करुणापर अभंग (अभंग ३४ ते ६८). इथे जनाबाई लेकरासारखी हाक मारतात. गंगा सिंधूकडे गेली आणि त्याने तिला नाकारले, तर ती कोणाकडे जाणार? शरण आलेल्याला तू नाकारलेस, तर तुझे ब्रीद जाईल, असा तर्क त्या देवासमोर मांडतात. “माय मेली, बाप मेला, आता सांभाळ” या ओळींमध्ये अनाथपणाची कळ आहे. गजेंद्र, गणिका, अजामेळ यांना तारणाऱ्या देवाने आपल्यालाही तारावे, ही मागणी आहे. बेचाळिसाव्या अभंगात खंत आहे की मी सेवा केली नाही, आणि देव माझ्यासाठी दळायला बसला. शेवटी हीन, दीन म्हणून भेट मागणे आणि क्षमेची याचना हेच या भागाचे सार आहे.
रोजच्या घरकामातून उमललेली विठ्ठलभक्ती
साधी, घरगुती आणि थेट मराठी भाषा
अभंग, ओव्या आणि आख्यानपर रचना
स्त्रीच्या मनाचे प्रामाणिक चित्रण
नामयाची दासी असा अभिमानाचा आत्मपरिचय